Tuesday, January 19, 2016

ईश्वर गुढ प्रश्न याला धम्मात स्थान नाही

ईश्वर गुढ प्रश्न याला धम्मात स्थान नाही
🍀🌸🍀🌸🍀🌸🌸🍀🌸🍀🌸
🔸देव ईश्वरासंबंधी तथागत बुद्धांनी काय म्हटले आहे धम्माचा विचार केला तर त्यांनी इतर गुढ प्रश्नांसारखच ईश्वर या संकल्पनेलाही सोडून दिलयं त्याला आपल्या धम्माच्या परिघाबाहेर ठेवलय. ईश्वरा बाबत ऋषीमुनींची, संप्रदायांची किंवा
लोकांची जी जी मतं होती ती सगळी
मतं बुद्धांनी नाकारलीत. प्रश्न हा आहे
की बुद्धांनी ईश्वराला आपल्या धम्मात
का स्थान दिलेलं नाही. किंवा ईश्वराला धम्माच्या परिघाबाहेर ठेवण्याचा निर्णय त्यांनी काय म्हणून घेतला. याची उत्तरं त्यांनी ईश्वराबाबत
काही लोकांशी केलेल्या चर्चा आणि
वादविवादां मधून मिळतात. 
🔸बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर बुद्धांनी सारनाथला इसिपतनच्या मृगदाय वनात पंचवर्गीय भिक्षुंनी आपलं पहिलं प्रवचन दिलं होतं. ते धम्म चक्र प्रवर्तन सुत्त या नावानं प्रसिद्ध आहे. त्यावेळी त्यांनी म्हटलय की माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, दैव, पूजापाठ कर्मकांड, विधी, यज्ञ या गोष्टीशी संबंध नाही. माझ्या धम्माचा
संबंध दुख कसं दूर करायचं, माणसानं नितीमान कसं बनायचं केवळ याच्याशी आहे.
▶ धम्मपदातल्या अत्तग्गोमध्ये तथागत म्हणतात,
🔸अत्ता हि अत्तनो नाथो, को हि नाथो परोसिया, अत्तना व सुदन्तेन, नाथं लभती दुल्लभं
🔸म्हणजे आत्माच (मन) आत्म्याचा स्वामी आहे, त्याचा स्वामी दुसरं कोण होऊ शकेल. जेव्हा माणूस आपलं पूर्णपणे दमन करतो किंवा आपल्या मनाला चांगलं वळण लावतो, तेव्हाच तो स्वतचा स्वामी किंवा मालक बनतो. बुद्धांनी मानवी अस्तित्वात मनाला केंद्रस्थानी मानलय. मन आपलं प्रमुख आहे. याचाच अर्थ
माणूस हा स्वत : च स्वत : च्या मनाला योग्य वळण लावू शकतो आणि सदाचारी किंवा सज्जन बनू शकतो. सुखी बनू शकतो.
🔸बुद्ध म्हणतात की आपलं दु : ख दूर करण्यासाठी माणसाला स्वत : च प्रयत्न करावे लागतात. त्याला दुसरं कुणीही सदाचारी बनवू शकत नाही. या सदाचारी बनण्याच्या प्रक्रियेत
ईश्वराचा कुठच संबंध येत नाही असं त्याचं म्हणण होतं. थोडक्यात असं सांगता येईल, की दु : ख दूर करायचं, सुखी कसं बनायचं, नीतीमान कसं बनायचं, आणि निर्वाण कसं प्राप्त करायचं यासाठी ईश्वराचा काडीचाही उपयोग होत नसल्याचं त्यांनी त्याचा संबंध आपल्या धम्मापासून तोडून टाकलाय.
🌷🍁🌷🍁🌷🍁🌷🍁🌷🍁🌷
नमो बुद्धाय
मंगल धम्म सकाळ
संजय पगारे
बुद्ध धम्म अनुसरण संघ
🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺

No comments:

Post a Comment